आमच्याविषयी

निर्मल ग्रुप ग्रामपंचायत नवानगर,तालुका दापोली , जिल्हा रत्नागिरी

आपले सहर्ष स्वागत करते. नवानगर हे एक शांत व ग्रामीण स्वरूपाचे गाव असून परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणारे आहे. गावातील लोकसंख्या प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून भात, ऊस, भाजीपाला व फळपिके ही प्रमुख शेतीउत्पन्ने आहेत. गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वीज, पाणीपुरवठा व रस्त्यांची मूलभूत सोय उपलब्ध आहे. सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, ज्यातून गावाची सांस्कृतिक एकता दिसून येते. शिक्षण, शेती व पायाभूत सुविधा या क्षेत्रांत हळूहळू प्रगती होत असून नवानगर गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत